Lok Sabha Election 2024 : ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर; ठाकरे गटाला मोठा धक्का

संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

ठाणे, कल्याणमध्ये शिंदे गटाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के (Naresh Mhaske)आघाडीवर आहेत त्यामुळे ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची पिछेहाट झाली आहे. तर, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर(Srikant Shinde leading) आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांना हा मोठा धक्का समजला जातोय. त्यामुळे लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालीये.

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)