IPL Auction 2025 Live

Aksa Beach in Mumbai: मालाड येथील अक्सा बीजवल तैनात जीवरक्षकांकडून 10 जणांना जीवदान, बुडण्यापासून वाचवले

हे दहाही जण पाण्यात बुडत होते. मात्र, इतक्यात जीवरक्षक तेथ पोहोचले आणि त्यांनी या 10 जणांचे प्राण वाचवले. मुंबई येथील जवळपास सर्वच चौपाट्यांवर बीएमसीने काही दिवसांपूर्वी जीवरक्षक तैनात केले आहेत.

मुंबई येथील मालाड परिसरातील अक्सा चौपाटीवर तैनात जीवरक्षकानी दुपारी 4 ते 7 या वेळेत 10 जणांना जीवदान दिले आहे. हे दहाही जण पाण्यात बुडत होते. मात्र, इतक्यात जीवरक्षक तेथ पोहोचले आणि त्यांनी या 10 जणांचे प्राण वाचवले. मुंबई येथील जवळपास सर्वच चौपाट्यांवर बीएमसीने काही दिवसांपूर्वी जीवरक्षक तैनात केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील समुद्रकिनारपट्टीवर सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यांतर बीएमसीने किनारपट्टीवर जीवरक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा, BMC Appoint Lifeguards On Mumbai Beaches: मुंबई महापालिकेकडून समुद्र किनारपट्टीवर 120 जवरक्षक तैनात)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)