मशिदींवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवण्यासाठी Raj Thackeray यांनी जारी केले पत्र; घराघरात ते पोहोचवण्याचे आवाहन
हे पत्र घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना केले आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. ज्या मशिदींवर भोंगे होते त्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालींसादेखील वाजवली होती. यामुळे देशात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता हा विषय कायमचा संपवण्यासाठी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपले एक पत्र दिले आहे. हे पत्र घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना केले आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.’
ते पुढे म्हणतात, ‘तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील - घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)