'ईदचा सण आनंदाने साजरा होऊ दे, अक्षय्य तृतीयेला कुठेही आरत्या करू नका'- Raj Thackeray यांचे आवाहन

रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, लाऊडस्पीकरचा मुद्दा नवीन नाही आणि धार्मिक मुद्दा नाही, तर सामाजिक आहे

Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरचा वाद संपताना दिसत नाही. रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, लाऊडस्पीकरचा मुद्दा नवीन नाही आणि धार्मिक मुद्दा नाही, तर सामाजिक आहे. 4 मे पासून कोणाचेही ऐकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की 3 मे पर्यंत मशिदींमधून सर्व लाऊडस्पीकर काढून टाकण्याच्या राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर ते ठाम आहेत. अशात त्यांनी एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी आवाहन केले आहे की, ईदचा सण आनंदाने साजरा होऊ दे तसेच अक्षय्य तृतीयेला कुठेही आरत्या करू नका.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now