Leopard Attack in Nashik Video: नाशिक मधील गुलमोहर कॉलनीत बिबट्याचा वावर, सीसीटीव्ही कॅमेरात कैद,

नाशिक मधील आनंदनगर गुलमोहर कॉलनी येथे रात्री मोठा बिबट्या दिसला. भरवस्तीत बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Nashik Big cat Photo credit Twttter

Leopard Attack in Nashik Video: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भरवस्तीत एका व्यक्तीवर रात्रीच्या सुमारास  बिबट्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नाशिक येथील आनंद नगरमधील गुलमोहर कॉलनीत रविवारीच्या रात्री बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याने नागरिकांच्या मनात धास्ती भरली आहे.  भररस्त्यात बिबट्या दिसल्याने परिसरात बोंबाबोम झाली आहे. प्रशासनाने रात्रीच्या सुमारास बाहेर पडू नका असा आदेश दिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरु आहे. बिबट्या हा गुलमोहर कॉलनीत वावरत आहे. एका ठिकाणी त्याने व्यक्तीवर हल्ला केल्याचे दिसून आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now