Leopard Attacks Dog In Pune: बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घरातल्यांची धावपळ; पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

मानवी वस्तीमध्ये दाखल झालेल्या बिबट्याने घरासमोरील कुत्र्यावर हल्ला (Leopard Attacks Dog In Pune) केल्याची एक घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे घडली आहे.

Leopard Attacks |

'मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर' या बातम्या आता सामान्य होऊ लागल्या आहेत. मानवी वस्तीमध्ये दाखल झालेल्या बिबट्याने घरासमोरील कुत्र्यावर हल्ला (Leopard Attacks Dog In Pune) केल्याची एक घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे घडली आहे. या गावातील बाळासाहेब ढमढेरे यांचा पाळीव कुत्रा अंगणात होतात. दरम्यान, दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घालत हल्ला केला. मात्र, कुत्र्याने जोरजोराने केकाटण्यास आणि भूंकण्यास सुरुवात केल्याने त्याचे प्राण थोडक्यात वाचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घटनेबाबत माहिती अशी की, बाळासाहेब ढमढेरे यांचे तळेगाव ढमढेरे येथे घर आहे. दरम्यान, त्यांनी पाळलेला कुत्रा घराच्या अंगणात थांबला होता. अशा वेळी एक बिबट्या तिथे आला आणि त्याने बिबट्यावर झडप घातली. हल्ला झाल्याचे लक्षात येताच बिबट्याने किंचाळायला आणि भुंकायला सुरुवा केली. कुत्र्याचे केकाटने ऐकून घरातील लोक बाहेर धावले. आजूबाजूला गोंगाट आणि आवाज होताच बिबट्याने कुत्रा सोडून धूम ठोकली. त्यामुळे बिबट्याचे प्राण कसेबसे वाचले. (हेही वाचा, Leopard Attack In Pune: पुण्यात जर्मन शेफर्ड कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद)

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ऊसाच्या पिकाला पाणी मोठ्या प्रमाणावर लागते. त्यामुळे ऊसाची शेती असलेल्या जमीनीत गारवा असतो. अशा वेळी उन्हाळ्याच्या दिवसात बिबट्या दिवसा ऊसात थंडाव्याला विश्रांती घेतो आणि रात्र किंवा पहाटेच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतो. अशाच एका बिबट्याने तळेगाव ढमढेरे परिसरात प्रवेश केला आणि कुत्र्यावर हल्ला केला.

ट्विट

बिबट्या हा मार्जर कुळातील मांसाहारी प्राणी आहे. तो प्रामुख्याने मृग, हरीण आणि रानडुक्कर यांसारख्या लहान ते मध्यम आकाराच्या शिकार करतो. ते पाळीव पशुधनाची शिकार करण्यासाठी देखील ओळखले जातात, त्याच्या या गुणामुळे मानवी वस्तीत प्रवेश होणे आणि मानवांसोबत त्याचे संघर्ष होणे नित्याचे होऊन बसले आहे. बिबट्या त्यांच्या ताकद आणि चपळाईसाठी ओळखले जातात. ते झाडांवर चढण्यास आणि लांब अंतरावर पोहण्यास सक्षम आहेत. त्यांच्या शक्तिशाली जबड्यांमुळे आणि स्नायूंच्या बांधणीमुळे ते स्वतःहून खूप मोठे शिकार काढण्यास सक्षम आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)