Kunal Kamra Row: शिवसेना नेते Rahool Kanal यांना अटक; कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील टिपण्णीनंतर केली होती Habitat Studio ची तोडफोड

कुणाल कामराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईतील खार परिसरातील कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती आणि ज्या हॉटेलमध्ये विनोदी कलाकाराने व्हिडिओ शूट केला होता त्या हॉटेलवरही हल्ला केला होता.

Rahul Kanal (Photo Credit- insta)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. कुणाल कामराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईतील खार परिसरातील कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती आणि ज्या हॉटेलमध्ये विनोदी कलाकाराने व्हिडिओ शूट केला होता त्या हॉटेलवरही हल्ला केला होता. आता या तोडफोडीच्या प्रकरणात, शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या 11 जणांना अटक केली आहे. सरचिटणीस राहुल कनाल म्हणाले, 'हा कायदा हातात घेण्याचा विषय नाही. हा पूर्णपणे तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांविषयी केलेल्या बदनामीबद्दल कुणाल कामरा याला शिक्षा झालीच पाहिजे. तसेच ज्यांनी हे त्याला करायला सांगितले आहे, त्याचा लवकरच खुलासा होईल.’

कुणाल कामराने आपल्या एक शोमध्ये एकानाथ शिंदे यांच्याबाबत एक गाणे सादर केले. यामध्ये त्याने त्यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला होता. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी खार येथील कामराच्या कार्यालयाची तोडफोड केली. या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावरही या मुद्द्यावरील चर्चा तीव्र झाली आहे. काही लोक याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणत आहेत, तर काही लोक म्हणत आहे की, विनोदालाही मर्यादा असायला हवी. (हेही वाचा: Kunal Kamra Song on Eknath Shinde: कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिपण्णीनंतर शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची धमकी, म्हणाले- 'भारतात कुठेही मोकळेपणाने फिरू देणार नाही')

राहुल कणाल यांना अटक-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement