Kunal Kamra ला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स; 5 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश

कामराच्या विडंबनात्मक कवितेप्रकरणी चौकशीसाठी त्याला हे समन्स बजावण्यात आले आहे.

Kunal Kamra (Photo Credit X)

शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक केलेल्या कवितेवरून वादात आलेल्या कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी तिसरं समन्स बजावलं आहे. 5 एप्रिलला त्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कामरा हा तामिळनाडूचा रहिवासी आहे. सध्या तो मुंबई मध्ये नाही. पण काही दिवसांपूर्वी एक विडंबनात्मक गाणं सादर करून त्याने वाद ओढावून घेतला आहे. आणि या प्रकरणी कोर्टाने आदेश दिल्याशिवाय माफी मागणार नसल्याचं त्याने स्पष्ट सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement