Kunal Kamra-Eknath Shinde Controversy: नेत्यांची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही: एकनाथ शिंदेंवरील विडंबनाच्या वादात कुणाल कामरा ने जारी केलं स्टेटमेंट
"राजकीय नेते" मला धडा शिकवण्याची धमकी देत आहेत पण त्यांना घाबरत नाही आणि नेत्यांची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही. असं त्याने म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेकडून मुंबईत एका स्टुडिओ ची तोडफोड झाली आहे. सध्या या प्रकरणी खटले सुरू झाले आहेत. स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आज X वर संबंधित वादावर प्रतिक्रिया देताना सविस्तर स्टेंटमेंट जारी केले आहे. आपल्या विनोदावर कोणताही राजकीय पक्ष नियंत्रण ठेवत नाही. "राजकीय नेते" मला धडा शिकवण्याची धमकी देत आहेत पण नेत्यांची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही. असं त्याने म्हटलं आहे. सोबतच या प्रकरणी माफी मागणार नसल्याचंही त्याने या निवेदनामध्ये म्हटलं आहे. नक्की वाचा: Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा ला कुणी पैसे दिलेत का? तपासणार; MoS Home, Yogesh Kadam यांची माहिती.
कुणाल कामरा चं स्टेटमेंट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)