Tractor Overturns in Krishna River: कृष्णा नदी ओलांडताना ट्रॅक्टर पाण्यात पलटी, इचलकरंजी येथील घटना
या घटनेत सहा जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सद्या पावसाचा प्रमाण कमी झाले असले तरी अधूनमधून दमदार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांनाही पूर आला आहे. सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत. इचलकरंजी येथील कृष्णा नदी ओलांडताना एका ट्रॅक्टरसोबत असाच प्रकार घडला. चालकाने तुडुंब भरलेल्या नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टर पलिकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाल्याने ट्रॅक्टर पाण्यात उलटला. या घटनेत सहा जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)