Kolhapur Airport New Timetable: कोल्हापूर विमानतळाकडून नवीन वेळापत्रक जाहीर; आता मुंबई, अहमदाबाद, तिरुपती, हैद्राबाद आणि बंगळुरूपर्यंत करता येणार विमाने प्रवास
कोल्हापूर विमानतळामुळे नागरिकांना देशभरात विमाने प्रवास करणं आणखी सोप होणार आहे.
Kolhapur Airport New Timetable: कोल्हापूर विमानतळाकडून नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार नागरिकांना आता मुंबई, अहमदाबाद, तिरुपती, हैद्राबाद आणि बंगळुरूपर्यंत विमानाने प्रवास करता येणार आहे. कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केले होते. काल कोल्हापूर-बंगळूर विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आतापर्यंत 255 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळामुळे नागरिकांना देशभरात विमाने प्रवास करणं आणखी सोप होणार आहे.