Mumbai Shocker : कुलाबा येथे काश्मिरी व्यावसायिकाला टोळक्याकडून बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल (Watch Video)

कुलाबा परिसरात लोकांच्या एका गटाकडून काश्मिरी व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. व्यवसाय सोडण्यासाठी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Photo Credit - Twitter

Mumbai Shocker : मुंबईतील कुलाबा परिसरात जमावाकडून काश्मिरी व्यावसायिकाला (Kashmiri businessman)बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत व्यावसायिक गंभीर जखमी (businessman serious injury) झाली आहे. त्याशिवाय, त्याला करत असलेल्या व्यवसाय सोडण्यासाठी धमकावण्यात आले. युनिस राथेर असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरच्या पादशाही बाग येथील तो राहणारा आहे. राथेर याला त्याच्या दुकानासमोर मारहाण करण्यात आली. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV footage) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्या, पोलिसांत तक्रार दाखल करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नाहीये. मारहाण का करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.(हेही वाचा:Mumbai Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now