Beed News: धनंजय मुंडे याच्यावर टीका करणारी करुणा शर्माच्या गाडीवर दगड फेक; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करुणा शर्मा हीच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीनी हल्ला केला आहे. या हल्लेत गाडीचे फार मोठं नुकसान झाले आहे.
Beed News: करुणा शर्मा हीच्या गाडीवर दगड फेक केल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर वेगवेगळ्या टीका केल्यानंतर करुणा शर्मा चर्चेत आली होती. मध्यरात्री करुणाच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या घटनेसंदर्भात करुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कारचं खुप मोठं नुकसान झाल्याचे करुनाने सांगितले आहे.हल्लेखोरांनी गाडीला उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीवर हल्ला कोणी केला याबाबत चोकशी सुुरु केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)