Karnataka Election Result 2023: कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली, निकालावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरू झाल्याची नांदी आहे

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने 136 जागेंवर आघाडी प्राप्त केली. या निवडणूकीत भाजपचा मोठा पराभव झाला असून या विजयानंतर काँग्रेसच्या मित्रपक्षाने काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. अजित पवार ट्विटमध्ये म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरू झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपाची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे.”

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)