Sanjay Raut On Indian Judiciary: 'देशात हुकूमशाहीचं सरकार?'; केंद्रीय कायदा मंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी भारताची न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा पुनरूच्चार केला आहे.
संजय राऊत यांनी भारताची न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा पुनरूच्चार केला आहे. जेव्हा देशाचे कायदा मंत्री किरण रिजीजू न्यायालयावर दबाव टाकणारी वक्तव्य करत आहेत तेव्हा त्याचा अर्थ काय? ते न्यायाव्यवस्थांना धमकावत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. जरी सरन्यायाधीश चंद्रचूड न्यायपालिकांवर दबाव नसल्याचं म्हणत असतील तरी तो आहे असे राऊतांनी पुन्हा म्हटलं आहे. दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना 'काही निवृत्त न्यायाधीश हे “अॅन्टी इंडिया गॅंग” चा भाग आहेत आणि ते न्यायव्यवस्थेला विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास भाग पाडत आहेत.' असे रिजूजू म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)