'आतंका ला अंत असतोच...' Jitendra Awhad यांनी अप्रत्यक्ष टोला लगावत शेअर केलेला व्हिडिओ बरंच काही सांगून जातोय! (Check Tweet)
आतंका ला अंत असतोच …..' अशी कॅप्शन त्यांनी लिहली आहे.
माजी मंत्री आणि एनसीपी नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'अन्याय अत्याचार शोषण' म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गाढवाला एक व्यक्ती अमानुषपणे वागवत असल्याचं पहायला मिळत आहे. पण काही वेळातच परिस्थिती बदलते आणि तेच गाढव त्या व्यक्तीला जशाच तसे उत्तर देतं. हा व्हिडिओ शेअर करताना 'विरुद्ध मुका प्राणी ही विद्रोह करतो …. आतंका ला अंत असतोच …..' अशी कॅप्शन त्यांनी लिहली आहे. हा व्हिडिओ आव्हाडांनी शेअर करताना प्रत्यक्ष कोणत्याही घटनेचा थेट उल्लेख टाळला आहे. पण सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता हा कुणासाठी अप्रत्यक्ष टोला होता का? अशी चर्चा रंगत आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)