Jayant Patil यांनी  फेटाळलं राजीनाम्याचं वृत्त; आज संध्याकाळी मुंबईत दाखल होण्याची शक्यता

जयंत पाटील यांच्याकडे सध्या एनसीपीचं प्रदेशाध्यक्ष पद आहे. जयंत पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत.

Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

शरद पवार यांच्या एनसीपी अध्यक्ष पदावरून पायाउतार होण्याच्या घोषणेनंतर काल वाय बी चव्हाण सेंटर मध्ये अश्रू आवरू न शकणारे जयंत पाटील आज पुण्यामध्ये आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर जयंत पाटील यांनीही राजीनामा दिल्याचं वृत्त तसेच त्यांच्या नाराजीचं वृत्त मीडीयात पसरत असताना त्यांनी आपण पक्षावर किंवा पक्ष आपल्यावर नाराज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच आपण कोणत्याही पदाचा राजीनामा देखील दिलेला नाही असं ते म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now