राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या संकेत सरगरचे जयंत पाटलांनी केले अभिनंदन

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत संकेतने रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे.

Jayant Patil

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत संकेतने रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. सांगली शहरातील संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. त्याच्या या कामगिरीबद्दल जयंत पाटलांनी त्याच्याकडे संवाद साधला आहे. त्यांनी त्याने केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jayant Patil - जयंत पाटील (@jayant_patil_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement