Janmashtami and Dahi Handi 2021: 'घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य व कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जन्माष्टमीनंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम राखूया. कृष्णाला सखा सर्वोत्तम मानले जाते. ते सर्व प्राणिमात्रांची आणि जीवलगांची काळजी वाहतात. त्यांना नमन करताना आपणही सर्वांची काळजी घेऊया. घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement