IAF Plane Crash Nashik: भारतीय वायू दलाचं मिग विमान नाशिकमध्ये कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी (Watch Video)
हे विमान ओव्हरहॉलिंगसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते.
IAF Plane Crash Nashik: भारतीय हवाई दलाचे एक Su-30 MKI लढाऊ विमान आज नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात मिग विमान कोसळलं आहे. वायू दलाचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे विमान ओव्हरहॉलिंगसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते. विमानाचे दोन्ही पायलट बाहेर काढण्यात यशस्वी झाले असून ते सुरक्षित आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे असे संरक्षण अधिकारी यांनी माहिती दिली आहे.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)