India Post Recruitment: नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रात डाक सेवक पदासाठी नोकरभरती; जाणून घ्या कुठे कराल अर्ज

भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातो, फोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

India Post प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

India Post Recruitment: भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या ५१ जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातो, फोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement