INDIA Mumbai Meet: मुंबईत इंडिया आघाडीची आजची बैठक संपली; 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार जागावाटपाची प्रक्रिया

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली आणि जागावाटपाची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

INDIA Mumbai Meet

मुंबईत सुरु असलेली इंडिया आघाडीची आजची बैठक पार पडली. विरोधी पक्षाच्या अनौपचारिक बैठकीनंतर मुंबईतील हॉटेलमधून बाहेर पडताना शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही (इंडिया आघाडी पक्ष) उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली आणि जागावाटपाची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये 28 पक्ष सामील झाले होते. याआधी 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी आघाडीची पहिली बैठक झाली. त्यानंतर दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे झाली. आता ही तिसरी बैठक मुंबईमध्ये होत आहे.

उद्या सकाळी सकाळी 10.15 ग्रुप फोटो सेशन होणार आहे. त्यानंतर 10.30 ते दुपारी 2 पर्यंत बैठक होईल व त्यात लोगोचे अनावरण केले जाईल. दुपारी 2 वाजता MPCC आणि MRCC द्वारे दुपारचे जेवण आणि दुपारी 3.30 वाजता इंडिया आघाडीची पत्रकार परिषद असेल. (हेही वाचा: Rahul Gandhi On Adani Group: अदानी समूहातील पैसा कोणाचा? राहुल गांधी यांचा PM नरेंद्र मोदी यांना सवाल)