Independent Candidate Balasaheb Shinde Dies: बीडमध्ये निवडणुकीदरम्यान उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेब बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर होते, तेव्हा त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि अस्वस्थता जाणवू लागली.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिंदे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिंदे यांच्या निधनानंतर बीड विधानसभा निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार निवडणुकीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या जागेवरील मतदान पुढे ढकलले जाऊ शकते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सुरक्षित ठेवला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी ह्रदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण सांगितले आहे. बीड विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब शिंदे यांचा मोठा प्रभाव होता.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेब बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर होते, तेव्हा त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर त्यांना प्यायला पाणी देण्यात आले आणि गर्दीपासून दूर एका हवेशीर ठिकाणी बसवले. मतदान केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या समर्थकांनी सांगितले की, बाळा साहेबांना चक्कर आल्याने ते खाली पडले होते, त्यानंतर त्यांना काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना छत्रपती संभाजी नगर रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनामुळे बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. (हेही वाचा: Suhas Kande Vs Sameer Bhujbal Rada: 'तुझा मर्डर फिक्स', सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यास थेट धमकी)

उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now