Mumbai News: बोरिवलीत चोरीच्या कारणावरून दुकानदाराकडून बेदम मारहाण, कर्मचाऱ्याचा मृत्यू
मुंबईतील बोरिवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बोरिवलीतील ५६ वर्षीय दुकानदाराने दुकानातून लसूण चोरल्याबद्दल त्याच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
Mumbai News: मुंबईतील बोरिवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बोरिवलीतील 56 वर्षीय दुकानदाराने दुकानातून लसूण चोरल्याबद्दल त्याच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. मारहाणाती कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे असे वृत्त एएनआयने प्रसारित केले आहे.आरोपी दुकानदाराचे नाव घनश्याम आगरी असे आहे, पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. पंकज मंडल असं मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. पंकजने दुकानातून लसूणची पिशवी चोरल्याने त्याला मारहाण केली आणि यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला असल्याचे सांगितले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)