Hoardings Collapsed in Hiranandani Garden at Powai: पवईतील हिरानंदानी गार्डन येथे बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग कोसळले; थोडक्यात बचावला ज्येष्ठ नागरिकाचा जीव
या व्हिडिओमध्ये बेकायदेशीर होर्डिंग रस्त्याच्या मधोमध कोसळल्याचं दिसत आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
Hoardings Collapsed in Hiranandani Garden at Powai: पवई (Powai) येथील हिरानंदानी गार्डन (Hiranandani Garden) येथे रस्त्याच्या मधोमध बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग (Hoardings) मुसळधार पावसामुळे कोसळले. या घटनेत सुदैवाने एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचला. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनने रस्त्याच्या मधोमध कोसळलेल्या होर्डिंगचा व्हिडिओ X वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये बेकायदेशीर होर्डिंग रस्त्याच्या मधोमध कोसळल्याचं दिसत आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. CCWA ने यापूर्वी या बेकायदेशील होर्डिंगसंदर्भात बीएमसीकडे तक्रार केली होती.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)