Eknath Shinde On Balasaheb Thackeray: आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक केले असते; एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य

बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला खऱ्या हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. महाराष्ट्रातील जनता आम्हाला मतदान करेल आणि त्यांना (उद्धव ठाकरे) डस्टबिनमध्ये फेकेल. कारण आम्हीच खरी शिवसेना आहोत, ते (उद्धव ठाकरे) नाही, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.

Eknath Shinde (PC - X/ANI)

Eknath Shinde On Balasaheb Thackeray: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) कार्याचे आणि राममंदिराच्या विकासाचे आणि कलम 370 रद्द करण्याचे कौतुक केले असते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांना (उद्धव ठाकरे) हिंदुत्वासाठी बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला खऱ्या हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. महाराष्ट्रातील जनता आम्हाला मतदान करेल आणि त्यांना (उद्धव ठाकरे) डस्टबिनमध्ये फेकेल. कारण आम्हीच खरी शिवसेना आहोत, ते (उद्धव ठाकरे) नाही, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. (हेही वाचा - Maratha Aarakshan: राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सरकार कडे सुपूर्त; 20 फेब्रुवारी ला विशेष अधिवेशन)

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement