Deepak Kesarkar on Thane Hospital Deaths: कळव्याच्या रूग्णालयात 48 तासांत 18 मृत्यू प्रकरणात चौकशी मध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळेल - मंत्री दीपक केसरकर

कळव्यातील हॉस्पिटल मध्ये मृत 18 रूग्णांच्या कारणाचा शोध एका कमिटीद्वारा घेतला जाणार आहे अशी माहिती केसरकरांनी दिली आहे.

Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

कळव्याच्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटल मध्ये मागील 48 तासात 18 रूग्ण दगावल्याने मोठी खळबळ माजली आहे. यानंतर तातडीने प्रशासन कामाला लागले असून आज मंत्री दीपक केसरकर यांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल. रूग्णांच्या मृत्यूचे कारण पाहिले जाईल. जर कोणी दोषी आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच मृतांच्या कुटुंबाला मदत केली जाईल असेही केसरकर म्हणाले आहेत. दरम्यान रूग्ण शेवटच्या टप्प्यात कळव्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याने त्यांना वाचवणं शक्य नव्हते असं सध्या दिसत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement