'अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू'- Minister Uday Samant
अशात आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट अजित पवार यांचे खुलेपणाने स्वागत करत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरु आहे. शिवसेनेपाठोपाठ आता त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अशात आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट अजित पवार यांचे खुलेपणाने स्वागत करत आहे. शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, 'अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांना चांगला अनुभव आहे, ते मोठे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. परंतु अजित पवार आमच्यात सामील झाल्यास आम्हाला खूप आनंद होईल.' (हेही वाचा: 'मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही', राष्ट्रवादी नेते Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)