'मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही', राष्ट्रवादी नेते Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
आता यावर स्वतः अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गेले काही दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यात आज अनेक माध्यमांनी वृत्त दिले की, अध्यक्ष शरद पवार पुण्यात असताना मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. मंगळवारी होणारी ही बैठक नेते अजित पवार यांनी आयोजित केली असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता यावर स्वतः अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार म्हणतात, ‘खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.’ (हेही वाचा: राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला Aaditya Thackeray यांचे उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले)
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)