Holi 2025: 'कोणत्याही मुस्लिमांवर संमतीशिवाय रंग टाकू नका'; Abu Azmi यांचे हिंदू बांधवांना आवाहन (Video)
आझमी म्हणाले, ‘उद्या, 14 मार्च रोजी रमजान आणि होळी दोन्ही आहे. जे वर्षभर नमाज अदा करत नाहीत, ते रमजानमध्ये नमाज अदा करतात. कारण ते महत्वाचे आहे. उद्या होळी साजरी करणाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी उत्साहाने ती साजरी करावी, मात्र तुम्ही जाणूनबुजून कोणावरही रंग फेकू नका.'
समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांनी रमजानमधील होळी आणि शुक्रवारच्या नमाजबाबत लोकांना मोठे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की ते कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारची नमाज अदा करतील. लोकांना त्यांनी सांगितले की, जेव्हा ते नमाज अदा करायला जातील आणि काही घडले, तर त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. नमाज अदा करा आणि घरी जा कारण सरकार आणि पोलीस त्यांचे आहेत. आता कायदा नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक नाही. माझ्यासोबत काय झाले ते सर्वांनी पाहिले आहे. आयएएनएसशी बोलताना अबू आझमी म्हणाले, मी मेलो तरी नमाज पठण करेन.
आझमी म्हणाले, ‘उद्या, 14 मार्च रोजी रमजान आणि होळी दोन्ही आहे. जे वर्षभर नमाज अदा करत नाहीत, ते रमजानमध्ये नमाज अदा करतात. कारण ते महत्वाचे आहे. उद्या होळी साजरी करणाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी उत्साहाने ती साजरी करावी, मात्र तुम्ही जाणूनबुजून कोणावरही रंग फेकू नका, कोणाचीही छेड काढण्यासाठी रंग फेकू नका. मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की, जरी कोणी तुमच्यावर रंग लावला तरी हा रमजानचा महिना आहे, म्हणून धीर धरा. भांडणात उतरू नका कारण हा क्षमा, बंधुत्वाचा महिना आहे.’ (हेही वाचा: Holi Colour Stain Removal Hacks: होळी खेळताना कपड्यांवर लागलेले रंगांचे डाग कसे काढायचे? 'या' क्लिनिंग हॅक्स करतील डागांची सुट्टी)
अबू आझमी यांचे हिंदू बांधवांना आवाहन-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)