Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ रौद्र रूपात; समुद्रात उंच लाटा Watch Video

सध्या अरबी समुद्रातून बिपरजॉय चक्रीवादळ पुढे सरकत असल्याने मुंबई मध्ये त्याचा परिणाम जाणवत आहे.

Mumbai | Twitter

अरबी समुद्रात आलेलं बिपरजॉय चक्रीवादळ रौद्र रूपात आलं आहे. अधिक शक्तिशाली झालेल्या या वादळाचा मुंबई मध्येही जाणवत आहे. आजही मुंबईचा समुद्र खवळलेला आहे. काही ठिकाणी अधून मधून हलका पाऊस बरसत आहे. तर समुद्रामध्ये उंचच  उंच लाटा उसळत आहेत. हे चक्रीवादळ पाकिस्तान मध्ये धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून मेघर्गजनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून ४५-५५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील आणि शहर आणि उपनगरात उष्णता आणि दमट परिस्थिती राहिल असा अंंदाज आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif