पावसाच्या पाण्यात वाहून जाणार्या पीकाला वाचवताना हताश झालेल्या वाशिमच्या शेतकर्याचा व्हिडिओ वायरल; केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले मदतीचे आश्वासन
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी हताश शेतकर्याला फोन करून त्याला मदतीचे आश्वासन केले आहे.
महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवस अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्याने तयार अन्नधान्याच्या पदार्थांचे नुकसान झाले आहे. वाशिम मध्येही जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या भूईमुगांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार्या एका मुलाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी हताश शेतकर्याला फोन करून त्याला मदतीचे आश्वासन केले आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना मदतीसाठी सूचना दिल्या आहेत त्यामुळे काजी न करण्याचे त्यांनी म्हटलं आहे.
शिवराज सिंह यांचा शेतकर्याला मदतीची खात्री देणारा कॉल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)