Nana Patole On PM Modi: मेहुल चोक्सीला इंटरपोलची नोटीस काढण्यात मदत करून पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाचा कसा गैरवापर केला हे दाखवून दिलं - नाना पटोले

मेहुल चोक्सीला इंटरपोलची नोटीस काढण्यात मदत करून पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाचा कसा गैरवापर केला हे दाखवून दिलं आहे, असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Nana Patole | (Photo Credit - ANI)

Nana Patole On PM Modi: पीएम मोदींचा हेतू स्पष्ट आहे की, त्यांना चुकीच्या लोकांचे रक्षण करायचे आहे आणि निरपराधांना तुरुंगात पाठवायचे आहे. मेहुल चोक्सीला इंटरपोलची नोटीस काढण्यात मदत करून पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाचा कसा गैरवापर केला हे दाखवून दिलं आहे, असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंध जाणून घ्यायचे आहेत. मोदींना भारत आणि जगभरातून कंत्राटे आणि पैसा का दिला जात आहे? अदानी मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यासाठी राहुल गांधींचा कसा छळ केला जातो हे जनता पाहत आहे, अशी टीकाही यावेळी नाना पटोले यांनी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement