Hari Narke Dies: प्राध्यापक, विचारवंत हरी नरके यांच्या निधनावर शरद पवार ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके मुंबईकडे येत असताना त्यांना त्रास झाला आणि यामध्ये त्यांचे निधन झाले.
प्राध्यापक, विचारवंत हरी नरके यांचे आज मुंबई मध्ये हार्ट अटॅकने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळी 6-10 दरम्यान पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यदर्शनाला ठेवलं जाणार आहे त्यानंतर रात्रीच त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्र शासनासोबत त्यांनी अनेक कामं केली होती. आज त्यांच्या अकस्मात निधनावर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
छगन भुजबळ
आदित्य ठाकरे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)