Gudi Padwa 2025 Wishes: गुढी पाडव्यानिमित्त पीएम नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवारसह अनेक नेत्यांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

गुढी पाडवा हा सण केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभाने नवीन संकल्प, आशा आणि उत्साह यांचा संचार होतो. समाजातील एकोपा वाढविण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे.

Gudi Padwa 2025 Wishes (PC- File Image)

गुढी पाडवा हा सण हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला हा सण साजरा केला जातो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार यंदा, 2025 मध्ये 30 मार्च रोजी साजरा केला जात आहे. वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवनिर्मिती, नवउत्साह आणि नवसंकल्पांचा सण आहे. या दिवशी गुढी उभारून, घरांची स्वच्छता करून, रांगोळ्या काढून आणि विशेष खाद्यपदार्थ तयार करून सण साजरा केला जातो. गुढी उभारणे हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरांच्या प्रवेशद्वारांवर तोरणे लावली जातात, रांगोळ्या काढल्या जातात, आणि गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यासाठी लाकडी काठीला नवीन वस्त्र, फुलं, साखर गाठी आणि कडुलिंबाची पाने लावून ती उंच उभारली जाते. हे समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. कुटुंबीय आणि मित्रमंडळींना शुभेच्छा देऊन, पारंपारिक पदार्थांचा आनंद घेतला जातो.

गुढी पाडवा हा सण केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभाने नवीन संकल्प, आशा आणि उत्साह यांचा संचार होतो. समाजातील एकोपा वाढविण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे. या दिवसाचे औचित्य साधत आज पीएम नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा: Happy Gudi Padwa 2025 HD Images: गुढी पाडव्याच्या दिवशी WhatsApp Status, Wishes, Wallpaper द्वारे आप्तस्वकियांना पाठवा हिंदू नववर्षाचे शुभेच्छापत्र!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement