Gram Panchayat Election Result 2022: ग्रामपंचायत निवडणुकीत ‘स्वराज्य’ संघटनेला अपेक्षित यश; राज्यात 98 ग्रामपंचायत सदस्य व 13 सरपंच म्हणून कार्यकर्ते आले निवडून
जे लोक आमच्या सोबत आहेत, आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कम पणे आम्ही उभे राहू.’
आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये 'स्वराज्य' संघटनेला अपेक्षित यश मिळाले असल्याचे कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात ‘स्वराज्य संघटना आजही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. काही लोक स्वयंपुर्तीने स्वराज्य संघटनेच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेत आहेत आणि लोकांचा त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वराज्य संघटने राजकारणात यावे अशीच इच्छा लोकांची असल्याचे दिसून येते.’
त्यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे- ‘महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल आज लागले असून, यामध्ये पहिल्याच प्रयत्नात 'स्वराज्य' संघटनेला अपेक्षित यश मिळाले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात 98 ग्रामपंचायत सदस्य व 13 सरपंच म्हणून ‘स्वराज्य’ संघटनेचे कार्यकर्ते निवडुन आले आहेत. यामध्ये कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, बिड, लातूर, नगर, परभणी, रायगड, उस्मानाबाद या जिल्हातील ग्रामपंचायतीचा समावेश होतो.’ ते पुढे म्हणतत, ‘यातून अधिक जोमाने काम करण्याची उर्जा आम्हा सर्वांना मिळत आहे. जे लोक आमच्या सोबत आहेत, आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कम पणे आम्ही उभे राहू.’