Gram Panchayat Election Result 2022: अकोला तालुक्यात 21 वर्षांच्या प्रिया सराटेची सरपंचपदी निवड; आजीचा केला पराभव

अकोला तालूक्यातील नैराट येथे अवघ्या 21 वर्षांची प्रिया सराटे नावाची मुलगी ग्रामपंचायत सरपंच झाली आहे.

प्रिया सराटे

महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतील 7751 ग्रामपंचायतींच्या जागांवर झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सध्याच्या निकालानुसार भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळत आहे. मात्र, जागानिहाय सर्वाधिक भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले. अशात यंदाच्या निकालामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली ती म्हणजे, अनेक ठिकाणी जनतेने युवक-युवतींना पाठींबा दिला आहे. अकोला तालूक्यातील नैराट येथे अवघ्या 21 वर्षांची प्रिया सराटे नावाची मुलगी ग्रामपंचायत सरपंच झाली आहे. प्रियाने नात्याने आपली आजी असलेल्या विजया सराटे यांचा पराभव केला आहे. गावात सरपंचपदासाठीचे आरक्षण हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी होते. त्यामुळे प्रियाने या निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता तिला 284 मते तर, प्रतिस्पर्धी विजया सराटे यांना 192 मते मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now