ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी विविध कंपन्यांसोबत शासनाचा सामंजस्य करार; होणार 62 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याची एकूण स्थापित क्षमता 46 हजार मेगावॉट त्यातून 40 हजार 870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात हे राज्याचे मोठे पाऊल आहे.
जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी, वेलस्पन न्यू एनर्जी, एन एच पी सी, रीन्यू हायड्रो पावर, टी एच डी सी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एकूण 35 हजार 240 मे.वॉ.चे वीजनिर्मिती करार करण्यात आले. या करारामुळे राज्यात एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 62 हजार 550 एवढी रोजगार निर्मिती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याची एकूण स्थापित क्षमता 46 हजार मेगावॉट त्यातून 40 हजार 870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात हे राज्याचे मोठे पाऊल आहे. यापूर्वीही राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत लक्षणीय पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. २०३० पर्यंत राज्यातील ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक साधनांतून होणार आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करू शकतो. राज्यात पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आहे. तेथे अनेक ठिकाणी शीतगृहांसाठी ऊर्जेचा वापर होणार आहे. शासकीय आणि खाजगी क्षेत्राने उत्सुकतेने हे करार पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले आहे. यामुळे राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस सहकार्य लाभणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा: Water Scarcity in Maharashtra: नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पापासून ते जलयुक्त शिवार योजनेपर्यंत, महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी Devendra Fadnavis यांचे प्रयत्न)
विविध कंपन्यांसोबत शासनाचा सामंजस्य करार-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)