Goregaon-Mulund Link Road: मुंबईकरांसाठी दिलासादायक! ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार गोरेगांव-मुलुंड लिंक रोडचे बांधकाम
या अंतर्गत गोरेगांव चित्रनगरी ते मुलुंड खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा (प्रत्येकी 4.70 किलोमीटर अंतर व चित्रनगरी परिसरातील 1.6 किमी लांब पेटी बोगद्यासह) बांधकामासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया यशस्वी ठरली आहे.
मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे. गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता अंतर्गत बोगद्याचे बांधकाम लवकरच होणार सुरु होणार आहे. बीएमसीने याची माहिती दिली. पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंडजोड रस्ता हा 12 किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत गोरेगांव चित्रनगरी ते मुलुंड खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा (प्रत्येकी 4.70 किलोमीटर अंतर व चित्रनगरी परिसरातील 1.6 किमी लांब पेटी बोगद्यासह) बांधकामासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया यशस्वी ठरली आहे. यामध्ये सर्वात कमी किंमतीची बोली जेकुमार-एनसीसी जेव्ही यांनी लावली आहे. सुमारे साडेचार वर्षांमध्ये हा बोगदा पूर्ण होणार असून ऑक्टोबर 2023 पासून प्रत्यक्ष काम सुरु होईल. (हेही वाचा: मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवासी लटकला, हवेत तरंगला, व्हिडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)