Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर दुर्घटनेत आतापर्यंत 47 जणांना बाहेर काढलं, घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश - देवेंद्र फडणवीस

मुंबईत जोरदार वा-यांमुळं घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडलीय. घाटकोपर पश्चिम येथील रमाबाई नंगर परिसरात भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला.

Mumbai Rains | Twitter

वादळाचा आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका मुंबईला बसला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे. 100 हून अधिक लोकं होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. "घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now