Chhatrapati Sambhaji Nagar Fire: किराडपूरा भागात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात ३ वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Fire Video PC TWITTER

Chhatrapati Sambhaji Nagar Fire: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किराडपूरा भागातील शरीफ कॉलनी येथे शुक्रवारी रात्री स्वयंपाक करताना घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात 3 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले आहे. घटनास्थळी तात्काळ बचाव कार्य सुरु झालं. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीनंतर परिसरात धूर पसरले होते. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा-अमरावती एक्स्प्रेसला आग, मुंबईतील दादर टर्मिनलवरील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)