Ganpati Visarjan Tragedy in Dhule: गणपती विसर्जनावेळी धुळ्यात मोठा अपघात; ट्रॅक्टरखाली चिरडून तीन मुलींचा मृत्यू (Video)

प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

The truck ran over people dancing during Ganesh visarjan in Dhukle. (Photo credits: X/@vani_mehrotra)

Ganpati Visarjan Tragedy in Dhule: महाराष्ट्रातील धुळ्यात गणेश विसर्जनाच्या वेळी भीषण अपघात झाला आहे. धुळे शहरालगत असलेल्या चित्तोर गावात ट्रॅक्टरने चिरडून तीन मुलींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यात गणेश विसर्जनासाठी ग्रामस्थ ट्रॅक्टरमध्ये गणेशमूर्ती घेऊन जात होते. त्यावेळी समोर नाचणाऱ्या लोकांवर ट्रॅक्टर धावला. या भीषण अपघातात 3 मुलींचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर व चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (हेही वाचा: Thane Murder: ठाण्यात निघृण हत्या, डोके नसलेले शरीर इमारतीच्या टेरेसवर आढळलं; पोलिस तपास सुरु)

गणपती विसर्जनावेळी धुळ्यात मोठा अपघात-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif