Angarki Chaturthi at Dagdusheth Halwai Temple: नवीन वर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश याग संपन्न

अंगारकी चतुर्थी निमित्त राज्यभरातील विविध गणपती मंदीरात आज वेगवेगळे कार्यक्रम पार पडत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात देखील गणेश याग संपन्न झाला आहे.

नव्या वर्षातली आज पहिली चतुर्थी आणि आजच्या चतुर्थीला विशेष महत्व आहे कारण आज अंगारकी चतुर्थी आहे. वर्षातील पहिलीचं चतुर्थी अंगारकी येणं म्हणजे सुवर्णयोगचं. प्रत्येक शुभ कामाची सुरुवात बाप्पाच्या आशिर्वादाने केल्यास काम यशस्वी होतं असा गणेशभक्तांचा विश्वास आहे, आता या संपूर्ण वर्षाची सुरुवात तर अंगारकीने झालीयं म्हणजे हे संपूर्ण वर्षचं यशपूर्ण. तरी राज्यभरातील विविध गणपती मंदीरात आज वेगवेगळे कार्यक्रम पार पडत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात देखील गणेश याग संपन्न झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement