Viswanath Mahadeshwar Dies: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Viswanath Mahadeshwar

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Viswanath Mahadeshwar) यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. रात्री 2 वाजता त्यांचे निधन झाले. 2002 साली विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई महानगरपालिकेत (BMC) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2003 ला ते महानगर पालिकेच्या शिक्षण समितीचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. 2017 मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या महापौरपदी त्यांची निवड झाली होती. अंधेरी विधानसभा (Andheri Assembly Election) पोट निवडणुकीच्या वेळी महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.  त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व,पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल, त्यांनंतर दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement