माजी मुंबई महापौर Kishori Pednekar आज पुन्हा ED office मध्ये दाखल झाल्या आहेत. किशोरी पेडणेकरांवर कोविड च्या काळात वाढीव दराने बॉडी बॅग खरेदी केल्याच्या प्रकरणात त्या ईडीच्या रडार वर आहेत.  ईडीने केलेल्या दाव्यानुसार कंपनी बॉडी बॅग दुसऱ्या कंपनीला दोन हजार रुपयांना देत होती. तिच कंपनी मुंबई महापालिकेला तीच बॉडी बॅग तब्बल 6,800 रुपयांना देत होती. या कंपनीसोबत देण्यात आलेलं टेंडर तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सहीने देण्यात आलं होतं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)