Former Chief Secretary Manoj Saunik: माजी मुख्य सचिव मनौज सौनिक यांची प्रधान सल्लागार पदी नियुक्ती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली. मनोज सौनिक हे मुख्यमंत्री कार्यलयात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम करणार आहे. 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी, मनोज सौनिक गेल्या वर्षी 31 डिसेंबरला नरेंद्र मोदी सरकारने त्यांची मुदतवाढ नाकारल्यामुळे त्यांच्या पदावरून निवृत्त झाले. मुख्य सचिव म्हणून ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर पर्यंत कारभार संभाळला होता. महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रधान सचिवाची नियुक्ती रखडली होती. शिंदे सरकारने आता ही सचिवाचे कामकाज पुन्हा सुरू केले असून मनोज सौनिक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)