Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला आग; एका कामगाराचा मृत्यू, 4 जण जखमी

अग्निशमन दल ,पोलीस,रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सध्या सुरु आहे.

Fire (PC - File Image)

अंबरनाथच्या वडोळ गाव एमआयडीसीत रासायनिक कंपनीला आज दुपारी मोठी आग लागली. ब्लु जेट हेल्थ केअर असं कंपनीचं नाव आहे.कंपनीतील एक रियाकटरचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीला मोठी आग लागली. अग्निशमन दल ,पोलीस,रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहे. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)