नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या 'पूर्णा -परळी पॅसेंजर' रेल्वेच्या बोगीला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही. एका बोगीला लाग लागल्याने त्यामधील वस्तू जळून खाक झालेल्या आहेत पण ही आग पुढे पसरलेली नाही. आगीचं वृत्त समजताच 30 मिनिटांत तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजताची आहे. Rats Inside Train Pantry Video: संतापजनक, रेल्वेच्या पेट्री कारमध्ये उंदारांचा धुमाकुळ, मडगाव एक्सप्रेसमधील व्हिडिओ व्हायरल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)