TMT bus Fire: टीएमटी बस मध्ये ठाण्यात Central Ground जवळ लागली आग; प्रवासी सुखरूप (Watch Video)
काही महिन्यांपूर्वी मुंबई मध्येही बेस्ट बस मध्ये अशाच आग लागण्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर काही बस बेस्टकडून वगळण्यात आल्या होत्या.
Thane Municipal Transport च्या बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. बस मध्ये 40-50 प्रवासी होते मात्र सुदैवाने सारे वेळीच सुखरूप बाहेर पडले आहेत. यामध्ये कुणीही जखमी नाही. ही दुर्घटना सकाळी 8.30 च्या सुमारासची आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान आग लागल्यानंतर 15 मिनिटांतच अग्निशमन दल ती विझवण्यासाठी पोहचली होती. काही महिन्यांपूर्वी मुंबई मध्येही बेस्ट बस मध्ये अशाच आग लागण्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर काही बस बेस्टकडून वगळण्यात आल्या होत्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)