Fire At Jarimari Area: साकीनाका येथी जरीमरी परिसरात आग, वाहतुक सेवा विस्कळीत
अंधेरीच्या साकीनाका परिसरात एका फॅक्टरीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Fire At Jarimari Area: अंधेरीच्या साकीनाका परिसरात एका फॅक्टरीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कुर्ला अंधेरी मार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहेत. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)